भोसरी भूखंड प्रकरणात फडणविसांची साक्ष नोंदवण्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप असणार्‍या भोसरी येथील भूखंड प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदविण्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील भूखंड खरेदीच्या प्रकरणातून एकनाथराव खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची आता उच्च न्यायालयात चौकशी सुरू आहे. यातील गेल्या सुनावणीच्या वेळेस अंजली दमानिया यांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना साक्षीदार करण्यात यावे अशी मागणी केली होती.

दरम्यान, सोमवारी या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी हीच मागणी पुन्हा एकदा केली आहे. एकनाथ खडसे यांचा कथित सहभाग असलेल्या भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात विशेष न्यायालयाने साक्षीदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भोसरी भूखंड भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात ही मागणी केली. भोसरी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश डी. एस .झोटिंग यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही दमानिया यांनी मांडली. आता 8 मार्च रोजी याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

Protected Content