Home Cities जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नगर आरोग्य सहाय्यकपदी विक्की राजपूत यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नगर आरोग्य सहाय्यकपदी विक्की राजपूत यांची नियुक्ती

0
45

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नगर आरोग्य सहाय्यकपदी विक्की राजपूत यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार,  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नगर आरोग्य सहाय्यक या पदासाठी विकी राजपूत यांची ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, कार्याध्यक्ष तुषार इंगळे, कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादीच्या आरोग्य सहाय्यक पदाची धुरा आपण चांगल्याप्रकारे संभाळणार असून गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही विकी राजपूत यांनी दिली आहे. गोरगरीब गरजूंना रुग्णांना चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल याकडे माझा कल राहील देखील विश्वास राजपूत यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound