अंतुर्ली येथे व्यायामशाळा बांधकामाचे भूमिपूजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली येथे आमदार एकनाथराव खडसे यांच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या व्यायामशाळेचे भूमिपुजन करण्यात आले.

 

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोलीस किंवा सैन्य भरतीसाठी  जाण्याची इच्छा  असते. तथापी अशी इच्छा असणार्‍या तरुणांना गाव पातळीवर व्यायाम साहित्याची उणीव भासते. त्यामुळे व्यायामाची आवड असणार्‍या युवकांची गैरसोय होते. याबाबत अंतुर्ली येथील तरुणांनी  वेळोवेळी आणि जनसंवाद यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांच्याकडे  अंतुर्ली येथे व्यायाम शाळेची निर्मिती व्हावी अशी मागणी केली होती

 

या अनुषंगाने रोहिणीताई खडसे यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्या कडे अंतुर्ली येथे व्यायाम शाळा मंजुरी साठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आ. एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अंतुर्ली येथे व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रुपये निधी मंजुर झाला होता.

 

दरम्यान, स्वातंत्र्य दिनी अंतुर्ली येथे रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते व्यायामशाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी माफदा संघटनेचे राज्याध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वररहाणे, बाजार समिती सभापती सुधिर तराळ, माजी सभापती निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष यु.डि.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, उपसरपंच गणेश तराळ, सुनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण सैन्य भरती व इतर भरतीसाठी तयारी करत असतात. अशावेळी जर त्यांना व्यायाम करण्यासाठी सोईसुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध करून दिल्या तर भरतीची तयारी करण्यासाठी त्यांना अधिक सोपे होईल. तसेच व्यायाम करणार्‍या इतर तरुणांची संख्या सुद्धा मोठया प्रमाणात आहे हि बाब लक्षात घेऊन आ. एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक आमदार निधी मधुन व्यायाम शाळेची निर्मिती होत आहे लवकरच व्यायामाचे साहित्य सुद्धा उपलब्ध होईल. हल्ली सोशल मिडीयाच्या जमान्यामध्ये तरुणाई मोबाईलमध्ये व्यस्त आहे. यामुळे तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीवर फार मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होत आहे. दररोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. व्यायामाची सवय लागल्याने शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते. म्हणुन तरुणांनी नियमित व्यायम करावा असे त्यांनी उपस्थित तरुणांना आवाहन केले

 

यावेळी राजुभाऊ शिरतुरे, कुलदीप महाजन,बसारत खा वामन दवंगे, अर्जुन धनगर, प्रल्हाद धायले, सलीम नामदार, निवृत्ती महाजन, पद्माकर कापसे, बबलू कापसे, हरिभाऊ पाटील,

शुभम दुट्टे, सौरव सपकाळ, रऊफ खान,आसिफ पेंटर, फिरोज शेख, जुबेर अली, मुस्ताक मण्यार, वहाब खान,इरफान खान, अनु पेंटर, सलमान खान अख्तर खान, फिरोज शाह सिद्दिक शाह, सोनु शेख, सरफराज शे शराफत, समिर शेख, सोहेल खान जाकिर खान आणि युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content