रस्त्यांच्या दुर्दशेमुळे चुंचाळेकरांचा हायवेवर ‘रास्ता रोको’

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव हा रस्ता अतिशय खराब झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ करून आपला रोष व्यक्त केला.

 

या संदर्भातील माहिती अशी की, अंकलेश्वर ते बर्‍हाणपूर हा दोन राज्यांना जोडणार्‍या राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या जवळपास ८ते १० किलोमिटरच्या रस्त्याची मागील दोन वर्षापासुन अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अत्यंत दयानिय अशी अवस्था झाली आहे.

 

या रस्त्याची दुरूस्ती व्हावी या मागणीचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी राज्य महामार्गावरील चुंचाळे गाव फाटयावर तिव्र रास्ता रोको आंदोलन केले.

 

या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुक ठप्प झाली होती . ग्रामस्थांच्या या रास्ता रोको आंदोलनास शिवसेना ( उबाठा ) चे तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे , भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत,डी एम पाटील,मुबारक तडवी,भिमराव वानखेडे , सुपडू संदाशिव, नितिन राजपुत , भरत राजपुत , अमित राजपुत , शिवाजी गजरे , मिर्झा तडवी , राजु वानखेडे, नंदन तायडे , दगडू तडवी , विनोद महाराज यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.

 

दरम्यान यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासित केले की सदर कामाच्या कंत्राटदारास लिखितपत्राद्वारे कळविण्यात आले असुन सदरच्या कामास मंजुरी मिळाली असुन पावसाळ्या नंतर कामास सुरुवात होइल असे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

Protected Content