फैजपूर शहराच्या हद्दवाढीसह तेरा विषयांना न.पा. सभेत मंजूरी

फैजपूर(प्रतिनिधी) । आज दि 6 रोजी फैजपूर पालिकेचे सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. शहराच्या हद्दवाढीसह तेरा विषयांना मंजुरी देण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला 163 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानंतर सभेत विषपत्रिकेवर 14 विषय चर्चेसाठी होते या सर्व विषयांवर चर्चा होऊन फैजपूर शहराची नुकतीच झालेली हद्दवाढीचा डीपीआर ( विकास योजना) तयार करणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत थ्रीस्टार रेटींग साठी नामांकन मिळणे कामी विचार विनिमय करणे नगरपालिका हद्दीतील मिल्लत नगर येथील गट नंबर 558 मधील खुल्या जागेत हरितपट्ट विकसित करण्याच्या कामाला मुदत वाढ देणे फैजपूर पालिकेच्या झालेल्या विविध 49 विकास कामांची तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दक्षता व गुण नियंत्रण नाशिक यांच्या कडे तपासणी शुल्काचा भरणा पालिका फंडातून करणे पालिका संचलित रुग्णालयात मानधन तत्वावर असलेल्या वैदयकीय अधिकारी यांचा राजीनामा अर्ज आल्याने नवीन वैद्यकीय अधिकारी नेमण्यसाठी कार्यवाई करणे. दलित वस्ती योजने अंतर्गत पोस्ट कार्यालय परिसरात व आठवडे बाजारातील सिटीसर्वे नंबर 3777 मार्केटमधील रमेश साळी यांच्या दुकानापासून ते सद्गुरू टॉकीज पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासह विषय पत्रिकेवरील 13 विषयांनवर विचार विनियमय करून मंजुरी देण्यात आली.
यावेळी व्यसपीठावर नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर सभेला भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीमखा मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते
सभेचे कामकाज कनिष्ठ अभियंता सईद शेख, सभालीपिक सुधीर चौधरी, लिपिक संतोष वाणी,

Protected Content