फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्या : भाजपाची मागणी

फैजपूर प्रतिनिधी । कोरोनाची जनजागृतीसाठी गेलेल्या फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व वाहन चालक उमेश तळेकर यांच्या सोबत रावेरातील तीन फळविक्रेत्यांनी हात उगारला होता. तिघांवर रावेर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत फैजपूर भाजपातर्फे निषेध व्यक्त करत प्रांताधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, यावल व रावेर विभागाचे प्रांताधिकारी शासकीय सुट्टी, उन्हाळा, कोरोनाची भीती, कुटुंब याची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता केवळ आपल्या उपविभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून पायाला भिंगरी लाऊन पूर्व- पश्चिम चोरवड पासून ते चिंचोली पर्यंत आणि उत्तर-दक्षिण सातपुड्यापासून ते तापीच्या खोऱ्यापर्यंत दोन्ही तालुके पिंजून काढणाऱ्या एका प्रांजळ,कर्तव्यनिष्ट अधिकारी यांच्या बाबतीत रावेर येथे घडलेल्या गैरवर्तणुकीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे..

इतर वेळा साहेबांना कामकाज करताना पाहिलेच आहे परंतु कोरानाच्या काळात अधिकाऱ्यामधील एक माणूस,एक डॉक्टर प्रकर्षाने बघायला मिळाला. प्रांत डॉ थोरबोले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहे, मात्र त्यांचा जास्त प्रेम आपल्या कर्मभूमीत म्हणजे आपल्या रावेर यावल तालुक्यात या दोन्ही तालुक्यात कोरोना पसरू नये व या काळात गोरगरीब जनतेला जिवनावश्यक सेवा मिळाव्यात म्हणून धडपड करत आहेत.

अश्या अधिकाऱ्याबाबतीत अशी घटना घडणे ही अत्यंत खेदजनक आणि लज्जास्पद बाब आहे. आज प्रांताधिकारी डॉ थोरबोले हे तालुक्यासाठी इंसीडेंट कमांडर म्हणून कामकाज करत असताना सर्व प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख म्हणून कामकाज करत आहे. त्यामुळे आजच्या घटनेमुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गात असंतोष निर्माण होणे साहजिक आहे. त्याचाच भाग म्हणून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. फैजपूर प्रांत अधिकारी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी फैजपूर भाजप शहरतर्फे करण्यात आली आहे. भाजपा फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ, दिपक होले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Protected Content