भिवंडीतल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; अजून काही जण अडकलेलेच !

भिवंडी । येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर पोहचला असून ढिगार्‍याखाली अजून काही जण अडकलेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे.

भिवंडी शहरातील धामणकरनाका येथील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोसळून २० रहिवाशांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.

आज सकाळपर्यंत इमारतीच्या ढिगार्‍याखालून २० मृतदेह काढण्यात आले असून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जिलानी या इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम आज सकाळी सुध्दा सुरू आहे.

Protected Content