चाळीसगाव प्रतिनिधी । भरधाव दुचाकीची जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील मोठ्या पुलावर घडली. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, संजय बुधा चौधरी (वय- ५० रा. गुरूदत्त कॉलनी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान संजय चौधरी हा दुचाकीवरून भावासोबत शहरातील मोठ्या पुलावरून (क्र. एम.एच.१९ सीबी ४१७७) जात असताना मागून अचानक भरधाव दुचाकीने (क्र. एम.एच.४१ आर ८६००) जोरदार धडक दिली. या अपघातात संजय बुधा चौधरी व भाऊ यांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच आरोपी (नाव गाव माहीत नाही) हा मोटारसायकल सोडून पसार झाला. सदर अपघात हा १३ जूलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडला असून जखमींवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होताच संजय बुधा चौधरी यांनी शहर पोलिस स्थानक गाठून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रात्री उशिराने दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अनिल अहिरे हे करीत आहेत.