Home क्राईम हॉटेलच्या वेटरनेच लांबविला रोकडसह १ लाख १५ हजारांचा ऐवज

हॉटेलच्या वेटरनेच लांबविला रोकडसह १ लाख १५ हजारांचा ऐवज

0
38

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीत खॉजामियॉ चौकातील हॉटेल गायत्री येथील वेटरने हॉटेमधील लॉकर फोडून तोडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद प्रकाश पवार वय 29  रा. शाहूनगर नुरानी मशिदीसमोर जळगाव यांचे गणेश कॉलनीतील खाजमिया चौकात हॉटेल जयश्री नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हॉटेमध्ये ओम निलेश्वर चतुर्वेदी (वय-२१) रा. सतना मध्य प्रदेश, ह.मु. गणेश कॉलनी जळगाव हा वेटर म्हणून कामाला आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान वेटर ओम चतुर्वेदी याने हॉटेलच्या केबिनमधील लॉकर तोडून १ लाख ५ हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आला आहे. याबाबत शरद पवार यांनी शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वेटर ओम निलेश्वर चतुर्वेदी याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

 


Protected Content

Play sound