यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव गावात एक वर्षीय चिमुकलीचा झोक्यातुन पडल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील भालाशिव गावात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील भालशिव या गावातील शिवारात शेतात राहणार गिरीष पारधी यांची एक वर्षाची राषी गिरीष पारधी नांवाची मुलगी ही झोपडी मधील बांधलेल्या झोक्यातुन पडल्याने तिला डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला जळगाव येथे उपचारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी ५, ३० वाजेच्या उपचारा दरम्यान सुमारास तिचा दुदैवी मृत्यु झाला असुन, या संदर्भात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीकारी डॉ . रेणुका भंगाळे यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद वर्ग करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल अशोक जवरे हे करीत आहे .