जळगावातील सराफ व्यापाऱ्याकडे केंद्रीय पथकाची छापेमारी !

Tax fraud

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सराफ बाजारातील एका सराफ व्यापाऱ्याकडे केंद्रीय महसूल संचालनालय पथकाने (डीआरआय) छापा टाकला असून गेल्या दोन ते तीन तासांपासून बंददरवाजा चौकशीसुरू असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील सराफ बाजारात असलेले सोने, चांदीचे तयार दागिन्यांचे होलसेल व्यापारी यांनी सोने चांदीच्या व्यवहारात कर चुकविल्याची माहिती इंदौर येथील डीआरआय पथकाला मिळाली होती. या संदर्भात जळगावातील सराफ व्यापाऱ्याची बंद द्वार चौकशी सुरू आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून ही चौकशी सुरू असून सराफ बाजारात एकच खळबळ उडाली आहे. किती किलो सोन्यावरील कर चुकला आहे याबाबत कोणतीही माहीती उपलब्ध झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून हे पथक जळगावात ठाण मांडून आहे.

Protected Content