नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची वा त्यावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही असे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते, यावर एमआयएमचे खा. ओवेसी यांनी भागवतांचे वक्तव्य हे तर संघाचे जुनेच डावपेच असल्याचे ट्वीट केले आहे.
कोणत्याची संवैधानिक पदावर नसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंदिर आणि मस्जिद संदर्भात वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित करू नये. लोकप्रिय नसताना त्यापासून स्वताला दूर ठेवायचे आणि ती वस्तू लोकप्रिय झाली कि स्वीकारायची हा संघाचा जुना डावपेच आहे. अयोध्येचा मुद्दा विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या पूर्वी संघाच्या अजेंड्यावर नव्हता. परंतु नंतर मात्र संघाच्या अजेंड्यावर आला. तसेच काशी, मथुरा, कुतुबमिनार याचा थेट संबंध संघाशी असून मोहन भागवत, जे.पी.नड्डा यांच्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी कायद्याच्या आधारे स्पष्ट संदेश द्यावा असेही खा. ओवेसी यांनी म्हटले आहे.