मोठी बातमी : ठरल्या तारखेवरच होणाार जिल्हा दुध संघाची निवडणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा दुध संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत सहकार विभागाने आदेशही पारित झाले होते. मात्र आता पुन्हा ही निवडणूक ठरल्या तारखेवरच घेण्याचे नवीन आदेश सहकार विभागाने काढले आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत पुन्हा मोठा ट्विस्ट निर्माण झाले असल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीबाबत दोनच दिवसात पुन्हा नव्याने आदेश निघाल्याने चर्चेला उधान आले आहे.

जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तसेच माघारीसह उमेदवारांना चिन्ह वाटप ही प्रक्रिया पार पडली आहे. त्या त्या पक्षांकडून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे तसेच प्रचाराला वेग आला असतांना सहकार विभागाने आदेश काढून या निवडणूका २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांमधून नाराजी सुध्दा व्यक्त केली जात होती. आता या आदेशाला दोन दिवस उलटत नाही तोच आज राज्य शासनाच्या सहकार विभागाने नव्याने आदेश काढले असून ठरल्या तारखेवर तसेच वेळापत्रकानुसार निवडणूका घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. शासनाचे सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी हे आदेश काढले आहे. ज्या टप्प्यावर या निवडणूकांना स्थगिती मिळाली होती. त्याच टप्प्यापासून पुढे ठरल्याप्रमाणे निवडणूकीची प्रक्रिया राबवावी असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, दोन दिवसातच निवडणूका पुढे ढकलल्या व पुन्हा वेळापत्रकानुसार निवडणूका घेण्याच्या या आदेशाच्या खो-खोच्या खेळामुळे नागरीकांमध्ये चांगल्याच चर्चा रंगत आहे.

Protected Content