मुक्ताई सूतगिरणी येथे शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरू

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । भरड धान्य खरेदी साठी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे गोदाम उपलब्ध झाले असून तेथे भरड धान्य खरेदी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे यांनी दिली आहे.

तालुक्यात शासकीय भरड धान्य खरेदी खरेदी विक्री संघ मुक्ताईनगर मार्फत सुरू करण्यात आली होती त्यासाठी महसुल विभागा मार्फत नायगाव फाटा येथील एका गोदामावर शासकीय खरेदीचे उदघाटन झाले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे गोदाम उपलब्ध होऊ शकले नव्हते,कुऱ्हा येथील गोदाम सुद्धा भरलेले असल्यामुळे शासकीय भरड धान्य खरेदी बंद झाली होती.

त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे ,जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्या बद्दल विनंती केली होती. त्याला अनुसरून एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे खेवलकर यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेशी बोलून आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी चांगदेव शिवार मुक्ताईनगर चे गोदाम भाडे तत्वावर उपलब्ध देता येऊ शकतात त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार शासकीय भरड धान्य खरेदी साठी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे गोदाम उपलब्ध झाले असून तेथे भरड धान्य खरेदी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे यांनी दिली आहे. मुक्ताईनगर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे तालुक्यातील 522 शेतकऱ्यांनी मका, ज्वारी या भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मक्याचा प्रती क्विंटल 1850 रु हमी भाव असून ज्वारीचा 2620 रु हमी भाव आहे तरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी क्रमांकानुसार आपला माल आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी येथील गोदमावर विक्रीसाठी आणावा असे आवाहन प्रभाकर झोपे यांनी केले आहे.

Protected Content