भडगावकर तरूण आज ‘करोडपती’च्या ‘हॉट सीट’वर !

भडगाव, संजय पवार | येथील मूळ रहिवासी असणारे मुस्तफा मिर्झा हे सोनी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात आज ‘हॉट सीट’वर बसणार आहेत. ते आता किती पैसे जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, भडगाव येथिल रहिवाशी तथा सध्या धुळे जिल्ह्यातील येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले मुस्तफा मिर्झा सोनी मराठी या वाहिनी वरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होऊन हॉटसीटवर बसणार आहे. भडगाव शहरातील तरुण या कार्यक्रमात दिसणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

भडगाव शहरातील सैय्यद वाडा येथील रहिवासी व सामाजिक बांधिलकी व सर्व धर्म समभाव जपणारे आदर्श मिर्झा कुटुंबातील मुस्तफा मिर्झा सदस्य आहेत. शेतकरी व व्यवसायिक इसा उर्फ शकूर बेग मिर्झा यांचे तिन्ही चिरंजीव मेहनतीच्या जोरावर आज सरकारी सेवेत आहेत. मेहनती शिवाय पर्याय नाही. मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन करता येत हे या कुटुंबाने दाखवून दिले आहे. यातील मोठे बंधू गफूर मिर्झा नाशिक येथे पाटबंधारे विभागात सेवा बजावत आहे, द्वितीय बंधु अजहर मिर्झा जळगाव येथे पोलीस आहे. तर लहान बंधू मुस्तफा मिर्झा धुळे जिल्ह्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहे.

यातील धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे महामार्ग विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा सोनी मराठी चॅनल वरील ‘कोण होणार करोड पती’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्द मराठी सिने आभिनेता सचिन खेडेकर हे करीत आहेत. मुस्तफा मिर्झा ‘कोण होणार करोड पती’ या कार्यक्रमात १७ जुन,२०२२ रोजी रात्री ९ ते १० वाजता या कालावधीत हॉटसिटवर पहायला मिळेल. सोबतच ‘सोबती’ म्हणुन मोठे बंधू गफुर मिर्झा पण दिसणार आहेत. यात ते नेमके किती पैसे जिंकणार याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात मुस्तफा मिर्झा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, सोनी मराठी टिव्ही ’कोण होणार करोडपती’ या अफलातून व अतिशय लोकप्रिय शोच्या खेळात सहभाग घेवुन मी हॉटसिट पर्यंत मजल मारली आहे. माझे अनेक वर्षापासूनचे स्वप्न सत्यात उतरले आहे. याचा मला मनस्वी आंनद आहे. माझ्या सोबत माझा भाऊ गफुर मिर्झा हा सोबती म्हणुन सहभागी झाला असून त्याचे पाठबळ मला मिळाले असल्याचे मुस्तफा मिर्झा यांनी आवर्जून नमूद केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: