अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिक्षा संपूर्ण देश करत आहे. 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. या साठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी जनतेला 22 तारखेला अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तरीही कित्येक जण हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
याचाच फायदा सध्या कित्येक सायबर गुन्हेगार घेत आहेत. सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये राम मंदिराचा फ्री व्हीआयपी एन्ट्री पास मिळवून देण्याचं आमिष दिलं आहे. यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. मात्र ही लिंक खोटी असून, या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत.