महावितरणची धडक कारवाई : रणगाव व गहुखेडा गावात आकोडे जप्त

सावदा ता. रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर आज महावितरण कंपनीने धडक कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून रणगाव व गहुखेडा गावात वारंवार फ्युज उडणे, अतिभारमुळे तार तुटणे, ह्यामुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होणे ह्यामुळे तक्रारीमध्ये वाढ झाली होती.

आज सोमवार दि २४.जानेवारी रोजी सावदा विभागातील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता योगेश चौधरी, विशाल किनगे, कनिष्ठ अभियंता मंगेश यादव, सचिन गुळवे , मुख्य तंत्रज्ञ जुम्मा तडवी , प्रधान तंत्रज्ञ पवन चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल पाटील,विजय पाटील, पराग चौधरी, दीपक भास्कर यांच्या पथकाने रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ९० वीजचोरीचे आकोडे काढण्यात आले असून दोन्ही गाव आकोडे मुक्त करण्यात आलेले आहे. अशी कारवाई ह्या पुढे ही निरंतर सुरु राहीन अशी माहिती थोरगव्हान कक्षाचे सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांनी दिली आहे.

Protected Content