नेरी नाका स्मशाभूमीतील कठडे दुरुस्त करण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरीनाका स्मशाभूमीतील कठडे दुरुस्त करावे, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद सेवा विभागातर्फे महापौर जयश्रीताई महाजन यांना देण्यात आले आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना काळात रोज अंदाजे पाच ते सहा तासांच्या अंतराने एक अंत्यविधी आपल्या नेरिनाका स्मशाभूमीत होत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून तेथील सर्व 12 कठडे हे तुटून भग्न झालेले आहेत. सध्या ते कठडे तुटलेले असल्यामुळे मृतदेहाचा अग्निससंस्कार हा पूर्ण होण्याआधीच तो मृतदेह कठडा तुटलेला असल्याने बाजूला सरकून बाहेर पडत आहे. अशाप्रकारे मृतदेहाची होणारी अवहेलना टाळण्यासाठी महानगरपालिकेने सर्व बारा कठडे दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड व जिल्हा सहसेवा प्रमुख श्री.दिपक दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदन देण्यासाठी, विश्व हिंदु परिषद जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, महानगर मंत्री मनोज बाविस्कर, महानगर सेवा प्रमुख बापू माळी, सहसेवा प्रमुख तुषार साळुंखे, किसन मेथे, मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Protected Content