जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात काहीही कारण नसतांना एका महिलेचे पती आणि मुलांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर घरातील सर्व सामानांची तोडफोड करून महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून पतीला बंदुकीच्या गोळीने मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात पुष्पा किरण सोनवणे वय ४३ या महिला आपल्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अजीज खान बाबु खान रा. गेंदालाल मील, जळगाव हा हातात कुऱ्हाड घेवून महिलेच्या घरी आला. महिलेच्या पती व दोन्ही मुलांना काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून नुकसान करत घरातील सामानांची तोडफोड केली आणि महिलेला तिच्या पतीला बंदुकीने मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पुष्पा सोनवणे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अजीज खान बाबु खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फकिरा रंधे हे करीत आहे.