अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पातोंडा येथील ग्रामविकास अधिकारी बी.वाय.पाटील यांना सन 2021-2022 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
जळगाव जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा ग्रामसेवक पुरस्कार हा ग्रामीण भागात विकासासाठी उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवक यांना दरवर्षी दिला जात असतो.सन 2021-2022 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे राबवून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश म्हणून पातोंडा ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भिमराव यादव पाटील यांना आदर्श पुरस्कार कुटुंबासमवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांच्या समवेत पातोंडा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच नितीन पारधी, ग्रा.पं.सदस्य सोपान लोहार,ज्ञानेश्वर सोनवणे,शरद शिंदे, किशोर पाटील, सुनिल पवार, प्रशांत पवार, विजय मोरे, घनश्याम पाटील, राजू वाणी आदींची उपस्थिती होती.