जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नंदगाव येथील जुन्या भांडणाच्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. चौकशी अंती बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मारहाण करणारे ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील नांदगाव येथे प्रदीप दिलीप सोनवणे वय ३६ हा तरूण वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता जुन्या वादातून प्रदीप सोनवणे याला गावात राहणारे रामनाथ पंडीत, बंडू सुनिल पवार, परशूराम रमेश धनगर, आणि भूषण पवार सर्व रा. नंदगाव ता. जळगाव यांनी शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रदीप सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचारा सुरू होते. याप्रकरणी चौकशी अंती अखेर बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रामनाथ पंडीत, बंडू सुनिल पवार, परशूराम रमेश धनगर, आणि भूषण पवार सर्व रा. नंदगाव ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत हे करीत आहे.