भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी येथील माहेरवाशीनीला इंदौर येथे किरकोळ कारणावरून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीला आले आहे. या संदर्भात मंगळवार २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनीतील माहेर असलेल्या साहिस्ताबी नईमुद्दोन शेख वय-३० यांचा विवाह नईमुद्दोनी नुरोद्दीन शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान किरकोळ कारणावरून पतीकडून विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिला मारहाण केली. तसेच सासू नणंद यांनी देखील त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता भुसावळ येथे माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी मंगळवारी २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती नईमुद्दोनी नुरोद्दीन शेख, सासू सुरजीराबी नुरोद्दीन शेख, नणंद अनिसाबी हुसेन आणि सलमाबी आरिफ खान सर्व रा.इंदौर यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख हे करीत आहे.