रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर नगर पालिकेच्या हद्दीत स्टेशन रोडवरील खड्डे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची जनतेतून ओरड होत आहे. खड्डे डांबरीकरणाने बुजवले जात असून, डांबराचा अपुरा वापर आणि खडी उखळल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिघडत आहे.

या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे संबंधित ठेकेदारांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डांबरीकरणात गुणवत्तेची पूर्णपणे ऐशी-गैशी केली जात आहे. यामुळे येथील रस्ते पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.
संबंधित प्रकरणी मुख्याधिकारी समीर शेख व नगर पालिकेचे बांधकाम अभियंता माळी यांनी तातडीने लक्ष घालून कामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. योग्य उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती दर्जेदार व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.