पी.व्ही. सिंधू विश्वविजेती झाल्याबद्दल तांदलवाडी शाळेत जल्लोष

tandalwadi

चोपडा प्रतिनिधी । जागतिक बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी.व्ही. सिंधूच्या सुवर्णमयी गौरवास्पद कामगिरीचा सर्वत्र जल्लोष होत असतांना तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलला रोजच्या बातम्या कथन उपक्रम प्रसंगी पी.व्ही. सिंधूच्या कामगिरीची सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक शिवाजी साळुंखे यांनी माहिती दिली.

भारतीय क्रीडा विश्वासाठीच्या या गौरवास्पद क्षणांनिमित्त खेळा बाबत जागृतीसाठी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी पी.व्ही. सिंधूच्या या सुवर्णमयी विजयाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला.

Protected Content