बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात रविवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नागवेल प्रतिष्ठानच्या वतीने बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 

बारी समाजाचा यंदाचा वधु-वर परिचय मेळावा हा तपपुर्ती मेळावा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शोभा बारी, मंगला बारी, नागवेल प्रतिष्ठानेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांच्यासह आदीची उपस्थिती होती. या मेळाव्यात गुजरात, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त जणांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला होता. तसेच आज मेळाव्याच्या दिवशी अजून ५० जणांची नव्याने नोंदणी करण्यात आली. असे एकुण ३०० जणांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे. बारी समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले असल्याची माहिती आयोजन प्रा. डॉ. नितीन बारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते वर-वधू सूचीचे प्रकाशनही करण्यात आले. यशस्वितेसाठी  भूषण बारी, शरद वराडे, अतुल बारी, योगेश बारी,  योगेश येऊल, बंटी लावणे, प्रा. दिपक बारी,  लतिष बारी,  नरेंद्र बारी,  प्रकाश रोकडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content