जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव सम्राट कॉलनी परिसरातील महादेव मंदीराजवळ उभा असलेल्या ट्रकमधून ९ हजार २०० रूपये किंमतीचे १०० लीटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आभिषेक अशोक तिवारी वय ३७ रा. दिक्षितवाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायक करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १६ मार्च रोजी रात्री ८ वाजता त्यांचा ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४०५७) हा सम्राट कॉलनीतील महादेव मंदीराजवळ पार्कींगला लावलेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ट्रकमधील डिझेट टँक मधून ९ हजार २०० रूपये किंमतीचे १०० लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना सोमवारी १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.