अजून एक प्रकल्प राज्याबाहेर : विरोधकांचे टिकास्त्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टाटांचा एयरबस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यावरून निर्माण झालेला वाद मिटत नाही तोच अजून एक प्रकल्प राज्यबाहेर गेल्याची माहिती समोर आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

 

सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प  आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.  फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा प्रकल्प नागपुरातल्या मिहानमध्ये सुरू होणार होता. यासाठी सदर कंपनी मिहानमध्ये १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सॅफ्रन ग्रुपचे सीईओ संबंधित अधिकार्‍यांना भेटले. परंतू जागा न मिळाल्याने हा प्रकल्प हैदराबादला जात आहे. सॅफ्रन ग्रुपचे सीईओ केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले आणि जागे अभावी हा प्रकल्प हैदराबादला जात असल्याचं सांगितले.

दरम्यान, हा प्रकल्प देखील राज्याबाहेर जाणार असल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.

 

Protected Content