डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे १२ परीक्षेत दणदणीत यश

0d5c736a e2e1 45f7 b71e dbd930c8221b

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा फेब्रुवारी व मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ६०.०९% वाणिज्य शाखेचा ९३.९४% व विज्ञान शाखेचा ८६.०१% एच.एस.सी.व्ही.सी. विभागातील एम.एल.टी. शाखेचा ९३.३३% इलेक्ट्रॉनिक्स ७२.४१% तर अकाउंटन्सी अँड ओ.एम. शाखेचा ८०.००% एवढा निकाल लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

 

कला शाखेतून रोहिणी वसंत गवई ही विद्यार्थिनींनी ७८.७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर दिपाली विकास वराडे ७५.०७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाणिज्य शाखेतून प्राजक्ता विजय भावसार ही ८७.२३% गुण मिळवून प्रथम तर सुवर्णा गंगाधर कदम ही ७८.८१% गुण मिळवून द्वीतीय तसेच विज्ञान शाखेतून प्रगती कीर्ती पांडुरंग सोनवणे ही ७७.६९ टक्के गुण मिळवून प्रथम तर प्राजक्ता गजानन पाटील हिने ७६.६२% गुण मिळवून द्वीतीय क्रमांक पटकावला आहे.

महाविद्यालयातील एच.एस.सी.व्ही.सी. विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतून कीर्ती वसंत पाटील ही ७३.८५% गुण मिळवून एम.एल.टी. शाखेतून जागृती प्रदीप बेहरे ही ७१.२३ % गुण मिळवून तर अकाउंटन्सी अँड ओ.एम. शाखेतून धनश्री काशिनाथ बेदरकर ७५.२३ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस. राणे, उपप्राचार्य श्रीमती एस.पी. पाटील, समन्वयक प्राध्यापक बाविस्कर, उपप्राचार्य बी.पी. सावखेडकर, प्रा.श्रीमती आर.एन. महाजन तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content