थोरगव्हाण येथील जि.प शाळेला काटेरी कुंपण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती माध्यमातून शाळेच्या आवारास काटेरी कुंपण लावण्यात आले. या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, स्वच्छता !” शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्यामचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला गावाचे तसेच आपण राहात असलेले परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांनी स्वता हाती कुर्हाड घेऊन शाळेला काटेरी कुंपण केल्याने सर्वत्र त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेला वाँलकंपाऊंड नसल्यामुळे शाळेत रिकाम टेकडे शाळेच्या आवारात नाशधुस करीत असतात. त्यामुळे शाळेतील चारही बाजूला शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षाने स्वंतः काटेरी कुंपण करीत शाळेच्या परीसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्पना अंगी बाळगली आहे.

शाळेच्या परीसरात काटेरी कुंपण झाल्यानंतर वृक्षरोपवन करुन झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील असुन शाळा व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी, गावकरी व शिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली काम करीत राहणार असल्याचे अध्यक्ष विनोद भालेराव यांनी सागीतले.

Protected Content