“आजच्या काळाशी निगडीत गांधीजीं- तत्व आणि सत्व” या विषयावर व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च जळगाव मध्ये रोटरॅक्ट क्लब आयएमआर आणि युथ आॅर्गनायझेशन फाॅर ग्रीन इंडिया यांच्यातर्फे “आजच्या काळाशी निगडीत गांधीजीं- तत्व आणि सत्व” या विषयावर गुजरात विद्यापिठाचे माजी कुलगुरू प्रा. सुदर्शन आय्यंगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सुरवातीला मनोगत व्यक्त करतांना आयएमआरच्या डायरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, “गांधीची तत्वे आजही जग फाॅलो करतो. अहिंसेचा मार्ग सर्वोच्च आहे.. शांततेने प्रश्न सुटतात हे समजून घ्या. प्रेमाने जग जिंकता येते.” त्यानंतर बोलतांना डॉ के विजय राव म्हणालेत, गांधीजी विथ मॅनेजमेंट हा विषय नीट समजवून घ्या. द्रष्टेपणा, संयम आणि नेतृत्व ह्या गुणांकडे गांधीच्या चष्म्यातून बघायला शिका, त्यांच्या पध्दतीने अंगिकारा. त्यानंतर रोटरॅक्टचे माजी अध्यक्ष आणि योगी चे प्रतिनिधी प्रणिलसिंह चौधरी यांनी “यंग इंडियाला गांधी समजावे म्हणुन आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो त्या कडीतला हा एक उपक्रम आहे. “ग्राम से लेकर जय जगत तक..”, अशी ही शृंखला आहे. त्यानंतर की नोट स्पिकर, प्रा. सुदर्शन आय्यंगर यांनी सांगितले,” गांधीच्या आयुष्याची लढाई समजून घ्या. गांधींना कसे बघायचे.. समजुन घ्यायचे..हे सांगताना विद्यार्थांना बिझीनेस हिस्ट्री समजवून घ्यायला त्यांनी प्रवृत्त केले. सोशल कॉस्ट संकल्पना उलगडून दाखवली . स्ट्रक्चरल व्हायलन्स सुध्दा समजवून सांगितला.

ते पुढे म्हणाले, “आम्ही या देशाला गांधींच्या मार्गाने नाही सांभाळू शकलो. पण सगळेच काही चुकीचे नाही तर तात्विक स्तरावर काही गोष्टी चुकल्या आहेत .. कुठलाही रस्ता एकमेव नसतो. गांधी तत्त्वाला पकडुन रहा.. गांधी तंत्राला नाही. गांधीने नेहरुंना पंतप्रधान म्हणून लिहीले होते की .. “देश कसा असावा.. शहरीकरण करु नका.. पण बाबुगीरीतुन सिस्टेमिटीक भ्रष्टाचार उभा राहिला.. सिस्टीम जास्त हावी झाली. योजना मोठ्या झाल्यात. पब्लिक सेक्टरचा अंतर्भाव झाला.. लायसन्स राज आले, ज्यातुन भ्रष्टाचार उभा राहिला . हा सिस्टीमचा दुष्परिणाम आहे. आज शेतकरी आत्महत्या करतात.. मजदुर मिळवायचे, बियाणे घ्यायचे आहे, वीज हवी.. पाऊस जास्त होतो . परवडते नाही, अनेक समस्या शेतकऱ्यांना आहेत. या समस्या का येत आहेत? आधीचे आदर्श काय होते? स्वयंपूर्ण खेडी होती. सेल्फ सस्टेनेबल सिस्टीम होती.. पाणी फार लागायचे नाही त्या शेतीला. आता सेंट्रल प्लॅनींग आले. तिथुन शेतीविषयक निर्णय होऊ लागले. असा देश चालत नाही..सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत आपण काही गोष्टी आपण रिस्टोअर करु शकत नाही पृथ्वीचे तापमान आता नको तितके वाढत आहे. गांधींनी विकेंद्रीकरणाला का इतके महत्व दिले होते ते आता तरी लक्षात घ्या. सोशल काॅस्टचा विचार करा. गांधी फकीर होता त्यांच्या कपड्यांचा खर्च फार कमी होता पण त्या काळातही त्यांच्या टेलिग्रामचे बिल भरपूर होते. कुठे कसा संपर्क ठेवायचा त्यांना नेमके माहित होते. काॅस्ट कमी करा डेनिम घालायची की खादी?? हे ठरवायला हवे त्यांनंतर डॉ शमा सराफ यांनी आभार मानले.

या संपूर्ण कारेक्रमाचे रोटरॅक्ट भाविका मानकर हिने केले. कार्यक्रमाला रोटरॅक्ट प्रेसिडेन्ट शिवानी चौधरी, रो उपाध्यक्ष भटू अग्रवाल सचिव सयाजी जाधव यांच्यासह सर्व रोटरॅक्टर्स उपस्थित होते.

 

Protected Content