पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टोळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. बापूराव भटा पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनियुक्त सरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला आहे.
या निवडप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य उपस्थित होते. यामध्ये उपसरपंच मालुबाई भिल, तसेच सदस्य अरुणा सर्जेराव पाटील, अलकाबाई महारू पाटील, सुवर्णा प्रवीण पाटील, मनीषा राजेंद्र पाटील, वाल्मीक सुपडू पाटील आणि कन्हैयालाल सुपडू पाटील यांचा समावेश होता.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंडळ अधिकारी गिरासे मॅडम, तलाठी गुरव आणि ग्रामसेविका जयश्री पवार हे उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ पाटील, गणेश पाटील, अजय पाचुंदे यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, ज्यात डॉ. राजेंद्र पाटील, प्रवीण वाघ, माधवराव पाटील, छबुलाल अर्जुन पाटील भानुदास, नारायण वाघ, विश्वास पंडित पवार, अर्जुन रामदास पाटील, हिरामण धुडकू पाटील, चूडामण पाटील, नंदूलाल पाटील, राजेंद्र देवरे, विनोद पाटील, गायत्री परिवाराचे गणेश शिंपी, प्रशांत येवले, प्रवीण पाटील, डॉ. विलास पाटील पारोळाकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त सरपंच श्री. बापूराव पाटील यांनी आपल्या मनोगतात, “गावाच्या प्रगतीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रोजगार सेवक आपले काम व्यवस्थित करत नसेल, तर त्याला बदलून नवीन सेवकाची नियुक्ती केली जाईल,” असे सांगत गावाच्या विकासासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. एम. पाटील यांनी केले, तर प्रवीण वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. बापूराव पाटील यांच्या निवडीमुळे टोळी गावाच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.