रूख्मीणी नगरात बापलेकावर धारदार शस्त्राने वार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । हरीविठ्ठल रोडवरील रूख्मिनी नगरात मागील भांडणाच्या कारणावरून तरूणासह त्यांच्या मुलावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत हरीश्वर महाजन (वय-३८) रा. किसनराव नगर जळगाव हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १५ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अक्षय माळी रा. रूख्मिणी नगर आणि त्याचा एक मित्र (नाव माहित नाही) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील रूख्मिणी नगरात जयवंत महाजन यांना शिवीगाळ व धमकी देत  धारदार शस्त्राने वार केले. यात जयवंत महाजन व त्यांचा मुलगा सोहम महाजन (माळी) हे जखमी झाले. जयवंत महाजन यांनी दोघांविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय माळी व त्याचा मित्र यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहे. 

 

Protected Content