यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील तहसील कार्यालयातील शिपाई कै. बाळू पाटील यांचे २० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक टपाल देऊन घरी परतत असताना, दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. भारतीय स्टेट बँक यावल शाखेतील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून जलदगतीने प्रकरण निकाली काढले. व मयत परिवारातील कुटुंबाला ४० लाखाचा विम्याची रक्कम तत्काळ मिळवून दिली.
कै. बाळू पाटील यावल तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते व त्यांचे पगाराचे खाते राज्य सॅलरी पॅकेज अंतर्गत भारतीय स्टेट बँक यावल येथे होते, सोबत त्यांच्या पत्नीचे ही खाते स्टेट बँकेत होते. कै. बाळू पाटील यांचे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पगार खात्याला ४० लाखाचा अपघात विमा रक्कम मंजूर करण्यात आली.
एसबीआय बँकेचे रिजनल मॅनेजर धर्मेंद्रसिंग, फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी बबन काकडे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, राधेश्याम मुंगमोडे भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यावल, सागर खेडेकर मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक जळगाव यांच्या उपस्थिती विमाची रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली. कै. बाळू पाटील यांच्या कुटुंबाने भारतीय स्टेट बँकेचे आभार मानले.