जामनेर येथे २१ जुलै रोजी बंजारा समाजाची तालुकास्तरीय बैठक

 

जामनेर (प्रतिनिधी): बंजारा समाजाची तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन रविवार २१ जुलै रोजी दुपारी १२ः००.वाजता रामवन,बोदवड रोड,जामनेर येथे करण्यात आले आहे.

 

या बैठकीमध्ये समाजातील विविध राजकीय,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामधील अडचणी व समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जामनेर तालुक्यातील बंजारा समाजामधील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,पोलिस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,शालेय व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी आणि सर्व सर्व समाजबांधवांनी या अतिशय महत्वपूर्ण बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content