पाकिस्तान येथील ‘जलजला कोह’ गायब

zalzala koh

वृत्तसंस्था । जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात, ज्या लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. एक अशीच घटना पाकिस्तानमध्ये घडली.

येथील ग्वादरच्या समुद्राजवळ असलेला एक द्वीप रातोरात अचानक गायबची घटना घडली आहे. नासाने याचे काही फोटो जारी केले आहेत. ज्यात द्वीप कुठेच दिसत नाहीये. म्हणजे हा द्वीप अचानक गायब झाला असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच पाकिस्तानात राहणाऱ्या काही लोकांचं देखील म्हणणं आहे की, ६०-७० वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. ज्यात एक द्वीप तयार झाला होता. नंतर तो आता अचानक गायब झाला आहे. या घटनेमुळे अनेकजण प्रश्न पडले आहेत. २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये आलेल्या भयावह भूकंपानंतर हा द्वीप पहिलांदा समोर आला होता. मात्र 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा द्वीप अचानक गायब झाला. हा द्वीप अंड्याच्या आकाराचा असून तो साधारण २९५ फूट लांब व १३० फूड रूंद होता. तसेच तो समुद्रापासून त्‍याची उंची साधारण ६० फूट होती. लोकांनी याचं नाव ‘जलजला कोह’ ठेवलं होतं. याच्या अर्थ भूकंपाचा डोंगर असा होतो. म्हणजेच, भूकंपादरम्यान टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने या द्वीपाची निर्माण झाली असावी असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. जेव्हा लोकांनी समुद्रात पहिल्यांदा हा द्वीप पाहिला होता, तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडला होता की, हा द्वीप अचानक आला कुठून? नंतर लोक नावेच्या माध्यमातून द्वीपापर्यंत गेले. तेव्हा त्यांना तिथे खूप चिखल, वाळू आणि दगड दिसले. सोबतच तिथे मिथेन गॅसही निघत असल्याचे सांगितले जात आहे.

Protected Content