केळीला मिळाला १६०१ रुपयांचा भाव : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । येत्या आठवड्यात पवित्र रमजान सोहळा येत असून या आगमनामुळे केळीला १६०१ रूपयांचा भाव मिळत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन येत्या काही दिवसात केळीच्या भावात अजुन मोठी वाढ होण्याची शक्यता केळीचा व्यवसाय करणारी मंडळी व बाजार पेठेतील जाणकारांचे मत आहे.

काळ बदलायला वेळ लागत नाही या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीत केळीचा काळ बदलला आहे आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी केळी कोणी घेईना अशी बिकट अवस्था केळी उत्पादक शेतकऱ्यांची झाली होती, अशी स्थिती झाली असतांना मात्र आता एका आठवडयावर येवुन ठेपलेल्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या उपवासामुळे केळीची परपरांतात वेगाने वाढल्याने आजचा काळ हा केळीचा आल्याने केळी घ्या केळी अशी वेळ आली आहे. त्यात ही उच्च प्रतीची दर्जेदार केळी तर जास्त भाव खावुन जात आहे. तेजीत कापणी भाव मिळाला नाही तर केळी नसल्यामुळे भाव मात्र कासव गतीने वाढत आहे.

मनवेल येथील शेतकरी धनसिंग सोमा पाटील यांचा उच्च प्रतिच्या केळीला १६०१ रुपयाचा भाव मिळाला आहे. मागील काळात केळी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रसंगी पटेल त्या भावात केळीची कापणी केली तर गेल्या काही दिवसापासुन केळीला चांगली मागणी वाढलेली आहे. दरम्यान आता बदलत्या वेळेनुसार केळी मिळत नसल्यामुळे व्यापारी भाव वाढुन देत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन येत्या काही दिवसात केळीच्या भावात अजुन मोठी वाढ होण्याची शक्यता केळीचा व्यवसाय करणारी मंडळी व बाजार पेठेतील जाणकारांचे मत आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!