काँग्रेसने राखला बामणोद ग्रामपंचायतीचा गड

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीत सर्वाधीक लक्ष वेधणार्‍या बामणोद ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्‍च काँग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम राखली आहे.

बामणोद ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकरआप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर विश्‍वनाथ चौधरी , यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने बामणोद ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे.

बामणोद ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा सरपंच सांभाळणारे काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते शिवराम किसन तायडे यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकीत पॅनल प्रमुख शिवराम तायडे यांच्यासह त्यांचा नातु व सुन यांनी ही या निवडणुकीत विजय मिळवले आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवार प्रभाग निहाय पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक१ शिवराम किसन तायडे यांना मिळालेली मते २८४ , याच प्रभागातील उमेदवार तुषार दिलीप ढाके यांना मिळालेली मते ४२३ विजयी झाले. प्रभाग क्रमांक१मधील प्रतीभा गुणवंत निळ विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक दोन गिरीश विलास तायडे मिळालेली मते ४४९ विजयी , प्रभाग दोन वैभव रमेश येवले, मते ४१५ विजयी , याच प्रभागातुन विजयी मनिषा गोपाळ जावळे मिळालेली मते ४८५, प्रभाग क्रमांक तिन दिलीप छन्नु बाविस्कर यांना मिळालेली मते ४२४ विजयी, निलीमा दिलीप बावीस्कर यांना मिळालेली मते ३९४ विजयी , प्रभाग तिन नथाबाई कैलास तायडे मते २८१ विजयी, प्रभाग क्रमांक चार तुषार दिलीप जावळे यांना मिळालेली मते ४५८ विजयी , याच प्रभागातील सुजाता चंद्रशेखर कोल्हे मते ४१२ विजयी , प्रभाग चार मधील विजयी दिपाली चंद्रकांत राणे यांना मिळालेली मते ३७८ विजयी , प्रभाग क्रमांक पाच मधील विजयी उमेदवार सुनिल फकीरा केदारे यांना मिळालेली मते ६०५ , याच प्रभागातील दुसरे विजयी उमेदवार छाया गौतम केदारे मते ६४८ विजयी व याच प्रभागातील दुसरे विजयी उमेदवार जरीना उस्मान तडवी यांना मिळालेली मते ६३३ असे असुन सर्व विजयी उमेदवारांचे बामणोद ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Protected Content