खामगावात आर्यनच्या गोड बोलण्यातून जनजागृती

खामगाव प्रतिनिधी । जगभर पसरलेल्या धोकादायक अशा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे व कमी करण्यासाठी खामगाव येथील सेंट अँन्स शाळेचा नर्सरीमधील आर्यन सराफ हा साडेतीन वर्षीय बालक बोबड्या गोड बोलण्यातून जनजागृती करत आहे. 

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे विविध स्तरावर उपायोजनापर जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबत स्वच्छता व सोशल डिस्टिंन्सचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या लॉकडाऊनचा लहान चिमुकले देखील मागील सहा महिन्यापासून घरात बसून अनुभव घेत असल्यामुळे त्यांना बाहेर कोरोना रुपी महाभयंकर संकट असल्याची जाणीव झाली की काय ? असेच म्हणावे लागेल. कारण खामगाव येथील सेंट अँन्स शाळेचा नर्सरी मधील आर्यन सराफ या साडेतीन वर्षीय चिमुकल्याने आपल्या बोबड्या गोड बोलण्यातून घरात ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत असतांना शाळेच्या एका ऑनलाइन उपक्रमांमध्ये कोरोना इज आऊट, वॉश युअर हँड, पुट मास्क, थँक्यू असा संदेश देत कोरोना डेंजर आहे, असे देखील तो आपल्या या व्हिडिओमध्ये सांगत असल्याचे दिसून येते. एकंदरीत आता या चिमुकल्यांना देखील कोरोनाच्या प्रादुर्भावाची वातावरणातली जाणीव करून दिली की काय ?असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

Protected Content