जामनेर प्रतिनिधी । येथील वाकी रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांसाठी दरवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन जनजागृती करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करुन जनजागृती करण्यात येत असते. यावर्षी “सबका मलिक एक” हा सजीव देखावा प्रतिष्ठान कडून सादर केला जात आहे. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सजीव देखाव्यात व्यसन मुक्ती, हिंदू मुस्लिम एकता यांसह आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सजीव आरासचे लेखन तथा नाट्यसंकलन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्यान पंडित रविंद्र महाजन याचे असून दिग्दर्शन विलास कांडेलकर यांनी केले आहे.
या देखाव्यात भोला गोसावी, आदित्य राजनकर, लोकेश तेली, साहिल सोनवणे, दीपक पवार, अभिषेक राजनकर, दीपक मिस्त्री, मिहीर चिंचोले, मयंक चिंचोले, केतन महाजन, चेतन पाटील, देवयानी महाजन, गौरी पाटील, कोमल महाजन, सिद्धी पाटील, देवयानी पाटील, भक्ती घुले, भूमी माळवरकर, दीपाली नेवरे, चंचल नेवरे, फाल्गुनी नेवरे, आर्या टेमकर यांच्यासह आदी कलावंत विविध व्यक्तिरेखा सादर करत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुहास पाटील, नितीन राजनकर, उमेश पाटील, एकनाथ महाले, संदीप पाटील, अमोल सोनवणे, दत्ता पाटील, माणिकराव पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य कार्य करीत आहेत.