पारंपारिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा रॅलीत सहभाग (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने  शहरातील जी.एस.मैदान ते एकलव्य क्रीडा संकुलापर्यंत आदिवासी बांधवांच्या वतीने भव्‍य रॅलीचे आयोजन मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या रॅलीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी सहभाग नोंदविला होता.

 

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असून ९ ऑगस्ट रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता जी.एस. मैदानात आदिवासी जननायक तंट्या मामा भील, वीर एकलव्य आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी पारंपारिक वेशभूषेत आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत तीर कमान, बिलखे, शिबली ढोल असे पारंपरिक वाद्य व नृत्याचे प्रकार समावेश होता. सदरील रॅली ही जी. एस. मैदानावरून बसस्थानक, आकाशवाणी चौक मार्गे मु.जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुल येथे वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

या रॅलीत सचिन धांडे, भरत कर्डिले, विष्णू भंगाळे, विनोद देशमुख, कैलास मोरे, मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे, पुंडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, शांताराम पाटिल, संजय पाटील, सुभाष पवार, कल्पना पाटिल, ॲड धुमाळ, अजय पाटील, इरफान तडवी, इन्का बारेला, नुरा तडवी, मन्सूर तडवी, राणा चव्हाण, गणेश सूर्यवंशी, अशोक सोनवणे हे उपस्थित होते.

 

Protected Content