जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अंतर्गत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनने समाजासाठी विविध क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्प राबवून महिलांना स्वतंत्रपणे कसे उभे राहावे यासाठी व्यासपीठ दिले, ज्येष्ठ नागरिकांना प्रेम व आपुलकी दिली तसेच विविध प्रकल्पही राबविल्याने नुकतेच पार पडलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या सभेत क्लबच्या सदस्यांनी विविध पुरस्कार पटकावले.
इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303 ची ३२ वी सभा ‘मांदियाळी’ आणि पुरस्कार सत्र ‘सार्थक’ नुकतेच चाळीसगाव येथे संपन्न झाले. ज्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरल यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनने महिलांना शिक्षित होण्यासाठी आणि स्वतंत्रपणे घरात बसून स्वतःचा व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण, मुलांना ई-लर्निंग किटचे वितरण तसेच आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविले. तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अनन्या रॅलीकॉन कॉन्फरन्समध्ये देखील क्लब सहभागी त्याठिकाणी दिव्यांगांसाठी उपक्रम राबविण्यात आला.
इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या कार्याची दखल घेत अध्यक्षा नेहा संघवी यांना ७ पुरस्कार, सचिव इशिता दोशी यांना २ पुरस्कार, खजिनदार नेहा नैनानी यांना २ पुरस्कार, क्लब आयएसओ मुनिरा मास्टर यांना १ पुरस्कार प्राप्त झाला.
असोसिएशनच्या खजिनदार सरोज कठियार, जिल्हाध्यक्ष अश्विनी गुजराती यांच्यासह इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोशी, खजिनदार नेहा नैनानी, आयएसओ मुनिरा मास्टर, गुंजन कथुरिया आणि सदस्य गायत्री कुलकर्णी, हेतल सुरतवाला आणि मोना गांधी यांची उपस्थिती होती.