जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात २० ते २२ जानेवारी दरम्यान कान, नाक, घसा उपचार व शस्त्रक्रिया मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिभ,स्वरयंत्र,गाल,थायरॉईड,नाकातील वाढलेले कोंबने त्रस्त असलेल्या रूग्णांना एमजेपीजेवाय योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहे. प्रख्यात फिजिओथेरेपीस्ट तज्ञांकडून मोफत सल्ला, एमजेपीजेवाय योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, एम. आर. आय. सवलतीच्या दरात करता येणार आहे. नाव नोंदणीसाठी डॉ. अंकीता ८९९९८२५००४ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.