आज ठरणार विधानसभेतील विरोधी पक्षनेता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभाध्यक्षांच्या निवडीनंतर आता वेध लागलेय ते विरोधी पक्षनेतेपदाचे ! या अनुषंगाने या पदावर निवड करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीत दणदणीत बहुमत संपादन करत पहिली बाजी मारली आहे. राहूल नार्वेकर यांची झालेली निवड ही या सरकारचा आत्मविश्‍वास वाढविणारी ठरली आहे. तर यानंतर आता लवकरच विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्याने या पक्षाचे संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला जाणार आहे. या अनुषंगाने आज सायंकाळी पक्षाची बैठक होत असून यात नेत्याचे नाव ठरणार आहे. सध्या तरी या पदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यात अजित पवार यांचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे.

Protected Content