बिहारच्या पूर्ण निकालास लागणार वेळ

पाटणा वृत्तसंस्था । कोरोनामुळे यंदा वाढीव फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार असल्यामुळे बिहार विधानसभेचा निकाल हा सायंकाळी उशिरा लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

आज सकाळी 8 वाजेपासून बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात राज्य आणि काँग्रेस यांचे महागठबंधन आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. नंतर मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सातत्याने आगेकूच चालू ठेवलेली आहे. सध्याचा विचार केला असता भाजप आणि जनता दल युनायटेड यांची आघाडी १२८ जागांवर तर महागठबंधन १०४ जागांवर पुढे आहे. अद्याप दहा फेऱ्या झालेल्या आहेत. यापूर्वी विधानसभेचे मतदान हे २६ फेऱ्यांमध्ये पूर्ण केले जात होते, मात्र यंदा कोणाची स्थिती लक्षात घेता ३५ फेऱ्या होणार आहेत. यामुळे साधारण सायंकाळी उशिरापर्यंत निकाल लागण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे. तर क्षणाक्षणाला गणित बदलत असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यापैकी अद्याप कोणीही आनंदोत्सव सुरू केला नसल्याचेही दिसून आले आहे.

Protected Content