राष्ट्रवादीमध्ये योग्य लोकांचे नेहमी स्वागतच

नगर : वृत्तसंस्था । ‘राष्ट्रवादीमध्ये योग्य लोकांचे नेहमी स्वागतच केले जाते. आपला पक्ष कर्तव्यवान माणसाला नेहमी स्वीकारत असतो. राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी चांगल्या लोकांना वाट करून द्यावी,’ असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

भाजपचे एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा आहे, असे विचारले असता त्यावर टोपे बोलत होते. आरोग्य मंत्री टोपे हे मुंबई येथून जालना येथे जात असताना काही वेळासाठी नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते.

भाजपचे एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत येण्याची जी चर्चा सध्या सुरू आहे, याबाबत नेमकी काय परिस्थिती असून त्यांचे पक्षात स्वागत असेल का ? असे टोपे यांना विचारले असता,

‘मी एका व्यक्तीचे नाव घेणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादीमध्ये एखादी व्यक्ती आल्यावर याचा अर्थ राष्ट्रवादीच्या कुठल्याही त्या-त्या जिल्ह्यातील लोकांवर बाधा येईल किंवा ते मागे पडतील, असा कोणताही भाग नसतो. आपल्याला पक्षही वाढवायचा असतो. सर्वांना घेऊन काम करायचे असते, ती मानसिकता ठेवण्याची आवश्यकता आहे,’ असेही ते म्हणाले.

‘राज्य सरकार पारदर्शकपणे व जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने काम करण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामधून लक्ष विचलित करण्यासाठी काही मंडळी जाणीवपूर्वक काम करीत असतील, तर ते निश्चित चुकीचे आहे,’ असा टोलाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुशांतसिंह राजपूत व कंगना प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना लगावला.

Protected Content