मलिक निर्दोष असल्याचा अजूनही विश्वास आहे- गृहमंत्री

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनी अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. ईडीकडून लावण्यात आलेले आरोप कोर्टात टिकतील का? मंत्री मलिक निर्दोष असून आम्हाला त्याचा विश्वास असल्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारात सर्व माहित असूनही सहभागी असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण नोंदवले. यावरून राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली.

बॉम्बस्फोटातील आरोपींचा संबंध, जुन्या काळात काय व्यवहार झाले ? कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्याच्या मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कटाचा संबध, कुठल्या तरी गोष्टी काढून त्यामधून नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि प्रथमदर्शनी पुरावे आहेत की आरोपी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट आणि जाणूनबुजून सहभागी आहेत, म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जाते. त्यातून इडीला काय मिळाले? हा त्यांचा तपासाचा भाग आहे. परंतु मलिक निर्दोष आहेत, याचा आम्हाला विश्वास आहे, असेही ना. वळसे पाटील म्हणाले.

Protected Content