कळमसरे ग्रामपंचायत जिल्हा परिषद तर्फे पुरस्काराने सन्मानित

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा क्षयरोग (टीबी) मुक्त गाव म्हणून पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.

यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांना हा पुरस्कार जिल्हा परिषद जळगाव येथे प्रदान करण्यात आला. कळमसरे ग्रामपंचायतीला इ प्रथमच पुरस्कार मिळाल्याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी कौतुक केले. कळमसरे ग्रामपंचायतीने जिल्ह्यात विकासाचा आलेख उंचावला असून या माध्यमातून गावात बरीच विकास कामे झाल्याने यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी कौतुकही केले. ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाल्याने गावातील ग्रामस्थ, मंत्री अनिल पाटील, यांच्यासह सर्वत्र सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content