प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघाला तीन कोटींचा निधी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

या निधीच्या अंतर्गत असंख्य शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वर्णेश्वर मंदिर संस्थानसाठी ५० लक्ष तर रणाईचेतील चक्रधर स्वामी मंदिरात भक्त निवासासाठी ४० लक्ष यासह एकूण १६ मंदिर संस्थानला निधी मिळाला असल्याचे ना. अनिल पाटील यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मंत्री अनिल पाटील हे वर्णेश्वर मंदिरावर गेले असता त्यावेळी उपस्थित शिवभक्तांना त्यांनी मंदिर विकासासाठी भरघोस निधी देण्याचे अश्वासन दिले होते तर रणाईचे येथे नुकत्याच झालेल्या खिचपुरी महोत्सवात देखील त्यांनी भक्तांच्या निवार्‍यासाठी भक्तनिवास करण्याची घोषणा केली होती त्या गोष्टीला १५ दिवस देखील उलटत नाही तोच मंजुरी आणून मंत्र्यांनी शब्द खरा करून दाखविल्याने भक्त परिवाराने आनंद व्यक्त केला आहे.

मतदारसंघात या ठिकाणी विकासकामांना मिळाला निधी,,
मौजे पाडसे, ता. अमळनेर येथील भवानी माता मंदिर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,१० लक्ष,मौजे झाडी, ता. अमळनेर येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,३० लक्ष,मौजे दळवेल, ता. पारोळा येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे २५ लक्ष,अमळनेर शहरातील वर्णेश्वर महादेव मंदिर पर्यटन दृष्टया विकसीत करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,५० लक्ष,मौजे अंचलवाडी, ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,२५ लक्ष मौजे बोदर्डे, ता. अमळनेर येथील शनि महाराज मंदीर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,५ लक्ष,मौजे गलवाडे, ता. अमळनेर येथील म्हाळसादेवी मंदीर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे,१० लक्ष,मौजे निभोरा, ता. अमळनेर येथील राममंदीर येथे सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,१० लक्ष,मौजे मठगव्हाण, ता. अमळनेर येथील विठ्ठमंदीर येथे संरक्षण भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे १५ लक्ष,मौजे पिंपळे, ता. अमळनेर येथील नवनाथ व दत्तमंदीर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,२० लक्ष,मौजे आटाळे, ता. अमळनेर येथील भवानी मंदीर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,५ लक्ष,मौजे कावपिंप्री, ता, अमळनेर येथील लहरोबावा सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे,१५ लक्ष,मौजे तरवाडे, ता. अमळनेर येथील धनदाई माता येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर कामे १० लक्ष यांचा यात समावेश आहे.

याच्या जोडीला मौजे जवखेडा, ता. अमळनेर येथील दत्त महाराज मंदिर येथे डोम सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे, २० लक्ष,चक्रधर स्वामी महाराज मंदिर रणाईचे ता, अमळनेर येथे भक्तनिवास बांधकाम करणे व इतर अनुषंगिक बांधकाम करणे ४० लक्ष,मौजे ढेकू अंबासण ता. अमळनेर येथील श्रीराम मंदिर येथे चौक सुशाभीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे १० लक्ष असे एकूण ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

सदर विकास कामांच्या मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार, पर्यटन विकास मंत्री ना गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Protected Content