गुलाबराव देवकरांनी प्रचारदरम्यान जाणून घेतल्या अंतुर्लीकरांच्या समस्या


anturli

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली गावात जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचारार्थ ग्रामस्थांशी भेट घेतली. यावेळी ढोल ताश्याच्या गजरात गावातून प्रचार करण्यात आला तर ठिकठिकाणी महिलांना देवकरांचे औक्षण केले. प्रचार दरम्यान देवकरांनी नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील नागरीकांनी देखील परिवर्तनाची गरज असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

 

यावेळी अंतुर्ली गावातील ज्य़ेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग व ग्रामस्थांशी संवाद साधत राष्ट्रवादी आघाडीस सहकार्य करत परिवर्तनाचे आवाहन केले. यावर ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, पंजाबराव देवकर, जि.प. सदस्य स्नेहा गायकवाड, नितीन तावडे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, संजय पाटील, दिलीप शेंडे, युवकचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, डॉ. अमृत पाटील, शिवदास पाटील, निमन शेख, दिलीप पाटील यांच्यासह आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here