चोपडा येथे चेक अनादर प्रकरणी एकास दोन वर्षांची शिक्षा

court

चोपडा (प्रतिनिधी)। चोपडा येथील महावीर नागरी सहकारी पतसंस्थेला वटविण्यासाठी दिलेल्या सव्वा लाखाचे चेक अनादर झाल्याप्रकरणी एकास दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा चोपडा न्यायालयाने सुनावली आहे. या निकालाने शहरातील थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

चोपडा येथील महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांनी सभासद राम सुंदरलाल गुजराथी व त्यांची पत्नी प्रतिबाला राम गुजराथी रा. गुजराथी गल्ली चोपडा यांना नजरगहाण कॅश क्रेडिट कर्ज दिलेले होते. सदर कर्जापोटी आरोपी राम गुजराथी यांनी संस्थेस 1 कोटी बावीस लाख 22 हजार आठशे नव्हायाणव (१, २२, २२, ८९९) रुपयाचा चेक दिला होता. तो संस्थेने वटविण्यास टाकला असता सदरील चेक अनादर झाला. त्यामुळे संस्थेने चोपडा येथील ज्यूडी. मॅजि. वर्ग – १ सो यांच्या कोर्टात स.फौ.ख.६५४/२०१० दाखल केला. त्या खटल्यात चोपडा येथील मुख्य न्यायाधीश ग.दि.लांडबले यांनी आरोपीस दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन चेक रक्कम १, २२, २२, ८९९ /- ची दुप्पट रक्कम दंड म्हणून द्यावी व सदरचा दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सदर दंडाची रक्कम आरोपीने संस्थेस नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश ८ एप्रिल २०१९ रोजी दिला.  संस्थेच्या वतीने अमळनेर येथील ॲड. गजानन विचूरकर व सहाय्यक म्हणून ॲड.सुधीर जैन, ॲड. विशाल व्ही.पाटील, चोपडा तर ॲड. प्रदीप पाटील अमळनेर यांनी काम पाहिले. संस्थेचे वतीने फिर्यादी म्हणून मॅनेजर शोभा सांखला यांनी कामकाज पाहिले या निकालामुळे शहरात कर्ज थकबाकीदारांचे धाबे दणाणले.

Add Comment

Protected Content